लोक न्यूज
अमळनेर : गलंगी कडून चोपडा शहराकडे गांजा विक्री साठी आणणाऱ्या अडावद येथील मोटरसायकलस्वारांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सव्वा लाखाचा आठ किलो गांजा व मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील याना २० रोजी रात्री माहिती मिळाली की चोपडा तालुक्यातील गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे दोन जण मोटरसायकलवर गांजा विक्रीसाठी आणत आहेत. म्हणून त्यांनी हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे ,रवींद्र पाटील ,दीपक माळी याना पाळतीवर ठेवले. मात्र आरोपीना पोलिसांचा सुगावा लागला म्हणून त्यांनी शहराकडे पळ काढला. तिघा पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. त्याच बरोबर त्यांनी पुढे शहरात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे व विलेश सोनवणे याना कळवून नाका बंदी केली. पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपीनी मोटरसायकलवरून उडी मारून पळ काढला पोलीस उपनिरीक्षक वलटे यांनी धावत त्याचा पाठलाग करत पकडले. त्यांनी त्यांची नावे उदयभान संजय पाटील वय २१ राहणार चांग्या निम जवळ अडावद ता.चोपडा जि. योगेश रामचंद्र महाजन वय २१
राहणार खालचा माळी वाडा अडावद ता. चोपडा अशी सांगितली. त्यांच्या जवळून मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी डब्ल्यू ८०३५ तसेच ८ किलो १३० ग्राम गांजा ,दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २० (ब ) ,२० (ब) (२), २२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे , दीपक चौधरी , मदन पावरा , महेंद्र पाटील , अतुल मोरे यांचेही सहकार्य लाभले.