लोक न्यूज
दिनांक २२ जुलै २०२५
राज्याचे यशस्वी नेतृत्व करणारे, लोकनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने "महा रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला असून प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भैरवी वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी , माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी,प्रदेश पदाधिकारी हरचंद लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान उपक्रमाअंतर्गत अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
विशेषत: युवकांनी आणि पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजाप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन,सरचिटणीस भरत सिंह परदेशी, देविदास लांडगे, पांडुरंग महाजन माजी नगरसेवक,विजय राजपूत,उमेश वाले,भारती सोनवणे, राकेश पाटील, उपाध्यक्ष श्याम पाटील, कैलास भावसार, प्रीतपाल सिंग बग्गा, रमेश धनगर, दिलीप ठाकूर, राम भैय्या कलोसे, शिवा महाजन, विष्णू सैनानी,पिंटू चौधरी, दीपक भोई,बापू पाटील, श्याम भावसार,अनिल लाड,रवी ठाकूर, सचिन साळुंखे,संभाजी पाटील, पाटील,महेश पाटील,युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील,स्वप्निल चौधरी, भूषण सूर्यवंशी, निलेश पाटील, कल्पेश पाटील,भूषण महाजन,अक्षय चव्हाण, उज्वल मोरे, शुभम मोरे व रक्तदाते पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध, सामाजिक अंतर पाळून व आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून करण्यात आले.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सामाजिक कार्याला आणि नेतृत्वाला अभिवादन करताना अमळनेर भाजपच्या माध्यमातून एक सकारात्मक सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.