लोक न्यूज
अमळनेर : लोंढवे येथे अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना ११ रोजी पहाटे घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथुन आरोपीसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.लोंढवे येथील अल्पवयीन मुलगी १० रोजी रात्री आपल्या आईवडिलांसह अंगणात खाटेवर झोपली होती. ११ रोजी पहाटे ३ वाजता लघुशंकेला उठले असता त्यांना आपली मुलगी जागेवर दिसली नाही. मुलीचा आजूबाजूला शोध घेतला असता मुलगी आढळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , सागर साळुंखे यांना आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. तांत्रिक बाबी तपासल्या असता मनोहर भास्कर पवार वय २३ रा लोंढवे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले असून ते कोळपिंप्री येथे असल्याचे समजले. पथकाने आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.