लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील खर्दे येथे पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडल्याने बैल जागीच ठार होऊन तीन गुरे गंभीर जखमी झाले आहेत. तर सालदार देखील गंभीर जखमी भाजला आहे. तर लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उध्वस्त झाल्या आहेत.
       खर्दे येथे संभाजी पाटील यांच्या शेतात कुट्टी करण्याचे काम सुरू होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने सालदार गाड्याखाली येऊन बसला. आणि पाच गुरे गाड्याला बांधून ठेवली होती. साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला. इतर गुरेही जखमी झाले. सालदार राहुल राजेंद्र बारेला देखील गंभीर भाजला असून त्याला सध्या  डोळ्याला अंधारी येत आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातून नर्मदा फौंडेशन मध्ये आणण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , मुकेश साळुंखे यांनी भेट दिली.

      लोंढवे येथे वादळी वाऱ्यामुळे  संजीव पाटील व सुमनबाई नामदेव यांच्या निंबू बागेची शंभरावर झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

  १२ मे रोजी  लोंढवे गावात आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे शेतकरी संजीव नामदेव पाटील गट न ३१२ आणि सुमनबाई नामदेव पाटील गट न ३१५ यांच्या निंबू बागेचे १००  पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने फळबाग योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.