अमळनेर : रेल्वे स्थानकावर १५ मे दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी मालगाडीचे ७ डब्बे पट्ट्यावरून खाली घसरल्याची दुर्घटना घडली. खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन लवकर प्रयत्न करून वाहतूक सुरळीत करा आणि प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश दिले
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. खासदार मा. स्मिता वाघ यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मदत व पुनर्बांधणी कार्याची पाहणी केली.
या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असून, रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.खासदार स्मिता वाघांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. नंदुरबारहुन एक आणि भुसावळहुन एक अशा दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या आहेत. अमळनेर ते भोरटेक दरम्यान रेल्वे ट्रॅक वरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सुमारे २०० मजूर मागवून कोळसा काढण्यात येत आहे. पाच ते सहा तासात तिसऱ्या ट्रॅक वरून हळूहळू वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या रेल्वे गाड्या रद्द व वळवल्या
मजुरांनी गतीने काम सुरू केले होते परंतु पावसाने कामात व्यत्यय आणल्याने तिसऱ्या मार्गावरून काम सुरू करण्यास वेळ लागणार आहे. भुसावळ कडे जाणारी पॅसेंजर दोंडाईचा येथे थांबवण्यात आली आहे. सुरत अमरावती शिंदखेडा येथे थांबवण्यात आली आहे. मेमु नंदुरबार येथे तर सुरत जाणाऱ्या ताप्ती गंगा रावेर येथे , नांदेड बिकानेर जळगाव येथे आणि बिकानेर धरणगाव येथे थांबवण्यात आली आहे.
15 मे 2025 रोजी अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी घसरल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खालीलप्रमाणे गाड्यांवर परिणाम झाला आहे:
मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या (दिनांक 15.05.2025):
गाडी क्र. 09066 छपरा – सुरत विशेष गाडी ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 19046 छपरा – सुरत एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 22723 नांदेड – श्री गंगानगर एक्सप्रेस ही जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 06157 चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी विशेष गाडी ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 22972 पाटणा – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, बांद्रा टर्मिनस मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 20861 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, अहमदाबाद मार्गे वळविण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (दिनांक 15.05.2025):
गाडी क्र. 19004 भुसावळ – दादर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19006 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19008 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
अमळनेर येथील मालगाडी अपघात झाला त्या ठिकाणी खूप वेळ लागणार होता म्हणून तेथील लेबर जे काम करत आहेत त्यांच्या रात्रीची जेवणाची व पाण्याची व्यवस्था लायन्स क्लब, अमळनेर मार्फत करण्यात आली.