अमळनेर: येथील भूमी अभिलेख कार्यालयातून महत्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप चोरून नेणाऱ्या आरोपीला अटक करून अमळनेर पोलिसांनी लॅपटॉप ताब्यात घेतला आहे.
याबाबत स्मिता पोरशा गावित यांनी ३ एप्रिल रोजी ते दि. ४ एप्रिल शहरातील स्टेशन रोडवरील भुमी अभिलेख कार्यालयाचे कुलुप तोडुन, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचा ३० हजार रुपये किमतीचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप चोरीस गेल्याबाबत तक्रार दिली होती. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले व दत्तात्रय निकम यांनी चोरीच्या शोध घेण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ अशोक साळुंखे, पोहेकॉ मिलींद सोनार, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ निलेश मोरे, विनोद संदानशिव यांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना यापूर्वी अनेकदा सापडलेला प्रशांत जगन वाल्डे (वय 30 वर्षे) रा.अंकलेश्वर मूळ रा मोठे गोरगावले बु। ता. चोपडा जि. जळगांव) दिसून आला. त्याच्यावर संशय आला.
त्याच्यावर चार दिवस पाळत ठेवली. प्रशांत पुन्हा अंकलेश्वरहुन अमळनेर ला आल्यानन्तर पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने लॅपटॉप चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीला लॅपटॉप बाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांची दिशाभूल करून जपान नवीन भागात काट्यात लॅपटॉपचे कव्हर फेकले होते ते दाखवले व याच ठिकाणी लॅपटॉप होता असे सांगितले. मात्र आरोपी सराईत व तरबेज असल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा पोलीस स्टेशनला आणले. आणि त्याची चांगलीच "खातिरदारी" केल्यानंतर त्याने लॅपटॉप अंकलेश्वर येथे नेल्याचे कबुल केले. पोलिसांनी तेथून लॅपटॉप जप्त केला सुदैवाने भूमिअभिलेख कार्यालयातील डेटा जसाच्या तसा होता.