दिनांक 22 एप्रिल रोजी डांगरी ग्रामस्थ प्रतिनिधी मंडळ व स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रेचे आयोजक या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सर्वप्रथम डांगरी गावचे मा.सरपंच मा. अनिल शिवदास सिसोदे यांनी गावकऱ्यांच्या भावना या तुमच्या सोबत आहेत तुमचे स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे मात्र स्मारकाच्या लोकार्पणावरून होणारी तू, तू ,मै ,मै पाहता आपण आमच्या विनंतीला मान द्यावा व अमळनेर नगरपालिकेच्या लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाच्या लोकार्पणानंतर आम्ही तुम्हाला आमंत्रित करू त्यावेळेस सारे मिळून लीलाताईंच्या कार्यकर्तृत्वासाठी पदयात्रेचेजोरदार पणे स्वागत आम्ही करू म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आपणासमोर आलेलो आहोत यात्रा तूर्त स्थगित करावी याप्रसंगी डॉ.उत्तमराव पाटील यांचे पुतणे प्रशांत शांताराम शिसोदे हे देखील उपस्थित होते तसेच शिसोदे सर यांनी देखील आपले म्हणणे मांडताना सांगितले की आयोजकांचा हेतू अतिशय शुद्ध आहे ते देखील समाजवादी पुरोगामी विचाराचे आहेत आमच्याच लीलाताई आणि डॉ.उत्तमरावांच्या कार्यकर्तुत्वाचा प्रसार, प्रचार करीत आहेत त्यामुळे त्यांना विरोध करणे योग्य होणार नाही. मात्र त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन ही पदयात्रा आयोजित करावी अशी आम्ही विनंती करतो.त्यानंतर स्वातंत्र्यलढा स्मरणपद यात्रेच्या आयोजन समितीतील संदीप घोरपडे यांनी सांगितले की आम्ही डांगरी ग्रामस्थ व पत्रकार बांधवांचे लीलाताईंच्या नावाने बांधलेल्या इमारतीत तसेच प्रति सरकारच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या चिमठाणा खजिना लुटीतील सेनानींच्या स्मारकांमध्ये स्वागत करतो तसेच आपल्या गावकऱ्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही याचा सकारात्मक विचार करूत्यानंतर स्वातंत्र्यलढास्मरण पद यात्रेच्या प्रमुख नेत्या गीतांजली संदीप घोरपडे यांनी सांगितले की आम्ही वर्षानुवर्ष लीलाताई उत्तमराव पाटील प्रतिसरकारातील सेनानी यांचा परिचय शाळेतील विद्यार्थ्यांना करूनच देतो परंतु हा विचार महिलांसाठी तरुणांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग म्हणून मी पदयात्रेचे नेतृत्व करीत होते गावकऱ्यांच्या अतिशय प्रामाणिक भावनांचा विचार करता यात्रा स्मारकाची लोकार्पण होईपर्यंत स्थगित राहील परंतु पदयात्रा लोकांपर्यंत लीला ताईंचे विचार पोहोचविण्यासाठी निघणारच पत्रकारांनी उलट सुलट विचारलेल्या प्रश्नांमध्ये संदीप घोरपडे यांनी सांगितले की मी लीलाताई आणि डॉ.उत्तमराव पाटील यांचा अनुयायी आहे मी साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा आहे मी महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा जीवनात वापर करणारा सेवक आहे आणि म्हणून मधील काळात मला आलेल्या फोनवरून जी चर्चा झाली त्यांना मी सांगितले की मी लीलाताईंचे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींचे विचार सांगण्यासाठी गावोगावी फिरणारच आपण निषेध करा, शिव्या घाला, प्रसंगी मारा. परंतु आम्ही जे समाज हिताचे आहे ते कार्य करीत राहणार आणि अहिंसक आहोत याचा अर्थ आम्ही भित्रे घाबरत नाहीत आम्ही निर्भय आहोत आम्ही कोणाला शत्रू मानत नाही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही शत्रूचा देखील सन्मान करतो शत्रूला देखील प्रसंगी मदत करतो त्यामुळे आमचे कोणाशीही वाद नाही आम्ही कोणावर वैयक्तिक टीका करीत नाही आमची जीभ कितीही कठीण प्रसंग आला तरी घसरत नाही आज 40 वर्षाच्या प्रवासात अत्यंत बिकट परिस्थितीत पु.साने गुरुजी शाळा नावारुपाला आणली शाळेत मागील 25 वर्षापासून परिक्षेत कॉपी होत नाही म्हणून शाळेतून शिकून गेलेली माणसे प्रामाणिकपणे आपले जीवन जगतात सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत असतो 26 वर्ष नाट्यगृहाच्या उभारणीसाठी खर्च केले परंतु कोणी आमच्या उदो, उदो करावा त्या नाट्यगृहाच्या लोकार्पणात मला संधी द्यावी किंवा माझ्या नेत्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन करावे असा अट्टाहास मी कधी केला नाही कधी करणार नाही मी काम करतो आणि पुढे चालतो माझा प्रवास निरंतर चालूच राहणार तो देखील अहिंसक मार्गाने विधायक कामासाठी पदरमोड करून करत राहणार सदर पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन पदयात्रेतील दुसरे नेतृत्व अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बी.के सूर्यवंशी यांनी केले त्यांनी देखील ग्रामस्थांचा सन्मान राखला जाईल आणि पदयात्रा ग्रामस्थ सांगतील त्यावेळेस मोठ्या थाटामाटात सगळ्यांना सोबत घेऊन लीला ताईंचा व डॉ.उत्तमराव नानांचा स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींचा विचार गावागावात पोहोचवण्यासाठी आम्ही जाणार असे नमूद केले.