लोक न्यूज
अमळनेर-तालुक्यातील मुडी प्र. डांगरी गावात जिल्हा परिषद व डी.पी.डी.सी.च्या जनसुविधा योजनेंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
आ अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामे मंजुर झाली आहेत.ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर २० लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच, ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १० लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रेटीकरण व चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच सौ. मंदाबाई भावराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी उदयराजे भावराव पाटील, नानासाहेब पाटील, संजय पाटील, अरविंद हिमतराव पाटील, राजेंद्र वानखेडे, नारायण पाटील, महेंद्र पाटील, हेमंतराव पाटील, पंढरिनाथ पाटील, गौरव पाटील, गणेश भोई, मनोहर पाटील, गणेश बडगुजर, प्रणव पाटील, तुषार पाटील, संजय वडर, उदय पाटील, संजय पाटील, भैय्यासाहेब पवार, किशोर पारधी, ग्रामपंचायत अधिकारी विनोद पाटील तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील व सौ. जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून गावात होत असलेल्या भौतिक विकासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.आणि हे कार्य विकासाच्या दिशेने गावाच्या प्रगतीचा ठसा उमटवणारे ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.