लोक न्यूज
अमळनेर : गेल्या दोन वर्षात अल्पवयीन मुली ,सज्ञान तरुणी ,विवाहिता ,तरुण यांचे पळून जाण्याचे प्रमाण भयानक वाढले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे. साडे तीन  महिन्यात अमळनेर तालुक्यातून ४१ जण रफू चक्कर झाल्याची नोंद आहे.गेल्या सव्वा दोन वर्षात २९० जण मिसिंग झाले आहेत.
       तरुण तरुणींमध्ये एकमेकांमबद्दलचे आकर्षण , संस्कृतीचा ऱ्हास , सोशल मीडिया ,टीव्ही मालिका , चित्रपटातील अवास्तव दृश्य याचे  समाजावर दुष्परिणाम होत आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांवर याचे जास्त दुष्परिणाम होत असल्याने पालकांचा धाक संपून एक अज्ञात धाडस त्यांच्यात निर्माण झाले आहे. जानेवारी पासून तर एप्रिल १४ पर्यंत अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये २४ मुली १२ मुले तर मारवड पोलीस स्टेशनमध्ये मध्ये ३ मुली २ मुले असे एकूण ४१ प्रेमी  रफुचक्कर झाल्याची नोंद झाली आहे.  यात अनेकांना परत आणण्यात पोलिसांना यश आले असले तरी तरुण तरुणी आपल्या आई वडिलांच्या हातात मात्र लागलेले नाही. बहुतेक जण विवाह करून परतले आहेत. कोणी आपल्या आई वडिलांना  ओळखण्यास नकार दिला तर काहींनी आई वडीलासोबत  जाण्यास नकार दिला. काही युगुल अद्याप पोलिसांना आढळून आले नाहीत. एक दोन जण आपापल्या पालकांकडे पाठवण्यात यश आले आहे. २०२३ मध्ये अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये १०३ जणांची नोंद झाली आहे. तर २०२४ मध्ये  अमळनेर ११५ व मारवड अंतर्गत ३१ असे एकूण १४६ गायब झाले होते.
     अनेक घटना अशा घडतात की अल्पवयीन परिस्थितीत मुले पळून जातात. माहिती काहीच नसते. मात्र पोलिसांच्या तावडीत सापडतात आणि मग तरुणांना पोस्को कायद्यानुसार अटक करावी लागते. पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. मिसिंग ची नोंद झाली म्हणजे पोलिसांचा देखील ताण वाढतो. प्रत्येक घटनेत मुलीबद्दल सहानुभुती म्हणून पोलिसांवर दबाव वाढतो. नंतर मात्र कागदोपत्री प्रकरण फाईल करावे लागते. आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत कायद्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो.
    अख्ख जग मोबाईल मुळे आपल्या मुलामुलींच्या हातात आले आहे..म्हणून आता पालक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे.   पालक मात्र आर्थिक पलीकडे विचार करतांना दिसत .सध्या मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे..बदलत्या वयात होणारे शारीरिक मानसिक बदल विरूद्ध लैंगिक  आकर्षण निर्माण होणे. हे आकर्षण जिद्द हट्ट मध्ये रूपांतरित होते..एकमेकांविषयी जिज्ञासा वाढते. अशा वेळी टोकाचे निर्णय घेतले जातात.. अशा वेळी पालकांनी वेळीच लक्षात आल्यावर योग्य व्यक्ती किंवा डॉक्टरकडून समुपदेशन करून घेतले पाहिजे.   मुलगी पळते म्हणण्यापेक्षा मुलगा मुलगी दोन्ही पळतात , खरतर याबाबतीत मुलांचे व मुलाच्या पालकांचे प्रबोधन प्रशिक्षण होणे अधिक गरजेचे आहे- दर्शना पवार ,समाजसेविका ,अमळनेर