अमळनेर:- धुळे झोन ३६-बी अंतर्गत झोन स्तरीय महिला निरंकारी सत्संग समारोह अमळनेर येथे दि.२७/४/२५ रविवार रोजी, बंन्सीलाल पँलेस, अमळनेर याठिकाणी धुळे झोन चे क्षेत्रीय प्रभारी श्री. हिरालाल पाटील जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.यावेळी मुख्य मंचावरून प आ बहेन मनिषा चचलानी ब्रह्मज्ञान प्रचारिका डोंबिवली झोन यांनी भाव व्यक्त करतांना सद्गुरु ची जीवनाचा असलेली भूमिका सांगीतली सद्गुरु केवळ जगाच्या कल्याणासाठीच अवतरीत होत असतो. आणि भक्ति हा श्रद्धा व समर्पणाचा विषय आहे. परमात्मा निर्मल,निरंकार,,अखंड असून तोच जगाचा चालक-मालक आहे आणि त्याला जाणणे हेच मानवाचे मुख्य काम आहे. प्रत्येक परिवार,कुटुंब सुखी,आनंदी न्हावे, घर स्वर्ग बनावे यासाठी प्रेमाची गरज आहे ते निष्काम प्रेम सद्गुरुला आज भक्तांकडून अपेक्षित आहे. अतिशय साध्या व सरल भाषेत अनेक उदाहरणांनी सत्संगाचे महत्व विषद केले केले
या सत्संगात लहान बालिका, वयस्कर,नवयुवक -युवती असे लहान मोठ्या सर्वानी आपले भाव गीत विचार व कवीता यातून प्रगट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का राऊत व विधी आहुजा यांनी केले.
धुळे झोन 36-बी अंतर्गत जवळपास 23 ब्राँच मधुन महिला संगत, इंग्लिश मेडीयम संगत,बाल संगत,व यांच्या सह सर्व मुखी, प्रबंधक व साध संगत उपस्थित होते.
या कार्यक्रम दरम्यान अमळनेर येथील स्थानिक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी उपस्थिती दिली व त्यांनी देखील आपले भाव प्रकट केले.
तसेच सकाळ पासून आलेल्या भाविक भक्तांसाठी अल्पहार, चहा -पाणी , निरंकारी प्रकाशन, दवाखाना व महाप्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते. आलेल्या जिज्ञासू भाविकांना ब्रह्मज्ञान प्रचारक राजकुमार वाणी व जगदीश ओझरकर यांनी ज्ञानदान प्रदान केले.
अंतिम आभार स्वागत प.आ. हिरालाल पाटील जी, (झोनल ईंचार्जं, धुळे झोन ३६-बी व अनिता पाटील यांनी केले.)
या संत समागमासाठी सुंदर प्रकारे आयोजन नियोजनसाठी मुख्य मंच, मंचसंचलन स्टेज, हाँल सजावट,लगंर व वितरण इ.साठी एक दिवस आगोदरच जळगाव क्षेत्रातील सेवादल अधिकारी सह सेवादल सदस्य व साध संगत उपस्थित होते. व अमळनेर येथील स्थानिक शाखेचे मुखी श्रीचंद निरंकारी सेवादल ईंचार्ज आ. जितु डिंगराई जी, यांच्या सह स्थानिक महापुरुषांचे अथक परिश्रम लाभले.