अमळनेर : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या सीमा सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश हेमराज पाटील रा तारखेडा हा सीमा सुरक्षा बलात नोकरीला असून त्याला पोस्टाने मतपत्रिका पाठवण्यात आली होती. त्याने मतदान करून सोशल मीडियावर आपल्या मित्रांना व्हायरल केली. ही बाब पाचोरा १८ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारिंच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नायब तहसीलदार रणजित निंबा पाटील यांना आदेश दिले. रणजित पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला लोकप्रतिनिधी कायदा ,१९५० ,१९५१,१९८९ च्या कलम १३६(१), १३६(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गंगे करीत आहेत.