खासदार स्मिताताई वाघ

          मंत्री अनिल पाटील

लोक न्यूज
अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य बुथ कार्यकर्ता मेळावा खा.स्मिताताई उदय वाघ व मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
       सदर मेळावा आज सोमवार,, दिनांक 11 रोजी सायंकाळी 5.00 वाजता बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे होणार आहे. तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रन्टलचे अध्यक्ष, माजी जि प व पं.स सदस्य, सर्व सरपंच, उपसरपंच, वि.का.सोसायटीचे चेअरमन व संचालक, बुथ कमेटी कार्यकर्ते, माजी नगरसेवक व बाजार समितीचे आजी माजी संचालक यांनी उपस्थित रहावे अशी विनंती वजा आवाहन महायुतीचे सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष अमळनेर विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.