लोक न्यूज-
अमळनेर येथील स्व.श्री.एम.एस.मुंदडा विद्यालयातील विद्यार्थिनी भूमिका अहिरे हिने तालुकास्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरी भागातून प्रथम क्रमांक पटकाविला.
राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील ५१ माध्यमिक विद्यालयाचे ४६०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.स्पर्धेचा निकाल लकी ड्रॉ च्या माध्यमातून काढण्यात आला.या स्पर्धेत शहरी क्षेत्र मोठ्या गटातून स्व.श्री .मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यीनी भूमिका अनिल अहिरे (१० वी) हिचा प्रथम क्रमांक आला.
तिला अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .
तर तिला मार्गदर्शन करणारे हिंदी विषय शिक्षक सुनिल पाटील यांना "कृतिशील राष्ट्रभाषा हिंदी शिक्षक '' म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा व सर्व संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले
