लोक न्यूज-
अमळनेर; दिनांक 3 रोजी जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर येथे आयोजित क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व महाराष्ट्र कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) येथील खेळाडू कुमारी त्रिष्णा मनोज वाघ हिने 44 किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त करून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. त्यावेळी विजयी विद्यार्थिनीला सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या हस्ते स्पर्धे ठिकाणी गौरविण्यात आले. या स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान दिल्ली येथे पारपडणार आहे. त्रिष्णा मनोज् वाघ च्या यशासाठी तिचे काका सचिन वाघ (एनआयएस प्रशिक्षक ) व क्रीडा शिक्षक योगेश पाटील व सुनील करंदीकर यांनी मेहनत घेतली व योग्य मार्गदर्शन केले. तेव्हा शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर सर व शाळेतील शिक्षक वृंद यांनी विजयी विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
