अमळनेर-लोक न्यूज
अमळनेर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल शांताराम पाटील यांनी जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ११३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तालुका कार्यकारिणी जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, माजी आमदार स्मिता उदय वाघ यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष यांनी अमळनेर तालुकाध्यक्ष जाहीर केली आहे. ही कार्यकारिणी करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ बसवून सामाजिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सर्वांना सहभागी करण्याचा प्रयत्न तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केला असून पक्षाचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने ही

कार्यकारिणी सक्षम ठरणार आहे. सदरील निवडीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत