लोक न्यूज-
९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. गिरीश महाजन यांनी आज अमळनेर येथे जावून साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखायचं आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,डॉ. संदेश गुजराथी,निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणिस प्रा. डॉ.ए.बी. जैन, सहचिटणिस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, प्रा. आर. एम. पारधी, विनोद मधुकर पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व संदीप गायकवाड,ओबीसी प्रदेश सचिव भारतीताई सोनवणे, जिल्हा सचिव मीनाताई पाटील, माजी सभापती शाम अहिरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,माजी अध्यक्ष भरत पाटील माजी शहर अध्यक्ष हरचद पाटील, शहर सरचिटणीस राकेश पाटील,उपाध्यक्ष महेंद्र सर, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे सर, भास्कर पाटील,जिल्हा युवा मोर्चा योगिराज चौहान, शशी भाऊसाहेब , चेतन जाधव,माजी महिला अध्यक्षा छाया ताई भामरे, कविता ताई जाधव, माजी युवा मोर्चा अध्यक्ष पंकज भोई व सरचिटणीस समाधान पाटील, राहुल चौधरी, निनाद जोशी, अभिषेक पाटील, प्रितेश सोनवणे, सुनील पाटील यांची उपस्थिती होती
संमेलनासाठी या मान्यवरांची राहणार उपस्थिती.....
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
ESSAR पेट्रोल पंप के बाजू में, गलवाडे रोड, अमलनेर जि. जलगांव


