वैजापूर-लोक न्यूज
वैजापूर शहर व तालुका शांततेचे प्रतीक असून,येत्या काळात शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोणतेही आंदोलन, उपोषण,मोर्चे हे शांतता व सुव्यवस्थेच्या अधीन राहून लोकशाही मार्गानेच करावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना शुक्रवार(ता,२२)रोजी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता बैठकीत सहाय्यक पोलीस अधिक्षिका तथा उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी यांनी केले त्या पुढे म्हणाल्या की ,आरक्षण प्रश्न असो वा अन्य कोणतेही प्रश्न असो नागरिकांनी या बाबत माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला द्यावी व लोकशाही मार्गाचा अवलंब करावा,तसेच शहरात जे विविध प्रकारचे भित्तीपत्रके लावतात त्यांनी रीतसर परवानगी घ्यावी व ते विहित मुदतीत काढावे,मोबाईल वरील व्हाट्स अप चा दुरुपयोग टाळावा, मोबाईल वरील आक्षेपार्ह मजकूर खपवून घेतले जाणार नाहीअसेही त्या पुढे म्हणाल्या.
आरक्षण बाबत काही गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून ही बैठक घेण्यात येत आहे अअसे त्यांनी स्पष्ट केले,बैठकीचे प्रास्तविक स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांनी केले,सूत्र संचलन व आभार शांतता समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,या प्रसंगी तहसीलदार सुनील सावंत यांनी ही मत व्यक्त केले ,तालुका कॉग्रेस अध्यक्ष प्रशांत सदाफळ, संजय निकम, शिवसेना प्रमुख राजेंद्र पा,साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे,नगरसेवक गणेश खैरे,स्वप्नील जेजुरकर,भाजपा शहर अध्यक्ष दिनेश ढाकरे,समता परिषदचे बाळासाहेब शिंदे, मनसेचे सुनील गायकवाड, मराठा क्रांती चे मोती वाघ,सुनील बोडखे,अखिल शेख
,अल्ताफ बाबा, मंजुषा ढाकरे ,राजेंद्र साळुंके, पारस घाटे यांनी वैजापूर चा
जातीय सलोखा राखावा व कायदा सुव्यवस्था राखावी असे विचार मांडले ,रणजित चव्हाण,पो,पा,जरुळ श्रीमती सूर्यवंशी,प्रकाश शेठ बोथरा,निलेश पारख,भीमा आप्पा साखरे,अखिल कुरेशी, बाबासाहेब बहिरट,सुधीर लालसरे,रामचंद्र पिलदे ,यांच्या स,पो,नि संदीप पाटील,स,पो,नि ,पवनसिंग राजपूत,श्री मेटे यांची उपस्थिती होते.
