लोक न्यूज-
श्री. पंडीत प्रदिप मिश्रा (आंतरराष्ट्रीय कथा प्रवचनकार) हे नंदुरबार शहरातील श्री. छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इमारतीचे उदघाटन कार्यक्रमासाठी येणार आहेत. सदर उदघाटन सोहळ्यास सुमारे एक ते सव्वा लाख जनसमुदाय येण्याची शक्यता असून उदघाटन प्रसंगी मा. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई व

मा. श्री. देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई असे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.. सदर वेळी नंदुरबार जिल्हयाचे सिमेलगत जिल्हयातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच कार्यकर्ते वाहनांनी नंदुरबार येथे येण्याची शक्यता असल्याने दिनांक 22/04/2023 रोजी रहदारी नियमनाचे अनुषंगाने काही राष्ट्रीय व राज्य महार्गामध्ये बदल करून वाहतुक वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुक मध्ये बदल करणे आवश्यक आहे. 1) दोंडाईचा कडून येणारी लहान-मोठी चारचाकी वाहने, बसेस, अवजड वाहने ही चौपाळा फाटा कडून चौपाळे
गावातून सरळ उमदें रोड ओलांडून होळ तर्फे हवेली मार्गे पुढे नंदुरबार शहराकडे शहराबाहेरील उड्डाणपुला खालून
करण चौफुली मार्गे जातील. 2) साक्री, नवापुर कडून येणारी व शहादा किंवा गुजरात राज्याकडे जाणारी वाहने ढेकवद येथून पाचोराबारी,करणखेडा, वाकाचार रस्ता मार्गे शहादा, गुजरात राज्यात जातील. 3) करण चौफुली येणारी वाहने शहारा बाहेरील उड्डाणपुला खालून होळ हवेली गावातून उमर्दे गांव पुढे वावद मार्गे
दोंडाईचाकडे तसेच साक्रीकडे जाणारे वाहने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्गे साक्री व नवापुरकडे जातील.

4) प्रकाशा चौफुली कडून नंदुरबारकडे येणारी वाहने शहादा मार्गे दोंडाईचा व पुढे धुळे कडे जातील.

5) वाका चार रस्ता कडून येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकाशा मार्गे शहादा कडे जातील. तरी वरील प्रमाणे रहदारी नियमनासाठी व वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी दि. 22/04/2023 रोजीचे सकाळी 06.00 ते सायं. 18.00 वा. पावेतो राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील रहदारी अंशतः वळविण्या करिता जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहेत. दि. 22/04/2023 रोजीचे सकाळी 06.00 ते सायं. 18.00 वा. पावेतो खालील प्रमाणे राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील रहदारी अंशतः वळविण्या करिता आदेश जारी केले आहेत.

1) दोंडाईचा कडून येणारी लहान-मोठी चारचाकी वाहने, बसेस, अवजड वाहने ही चौपाळा फाटा कडून चौपाळे

गावातून सरळ उमदें रोड ओलांडून होळ तर्फे हवेली मार्गे पुढे नंदुरबार शहराकडे शहराबाहेरील उड्डाणपुला खालुन करण चौफुली मार्गे जातील. 2) साक्री, नवापुर कडून येणारी व शहादा किंवा गुजरात राज्याकडे जाणारी वाहने ढेकवद येथून पाचोराबारी,

करणखेडा, वाकाचार रस्ता मार्गे शहादा, गुजरात राज्यात जातील. 3) करण चौफुली येणारी वाहने शहारा बाहेरील उड्डाणपुला खालून होळ हवेली गावातुन उमदे गांव पुढे बाबद मार्गे दोंडाईचाकडे तसेच साक्रीकडे जाणारे वाहने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्गे साक्री व नवापुरकडे जातील.

(4) प्रकाशा चौफुली कडुन नंदुरबारकडे येणारी वाहने शहादा मार्गे दोंडाईचा व पुढे धुळे कडे जातील. 15) वाका चार रस्ता कडून येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकाशा मार्गे शहादा कडे जातील. सदर प्रतिबंधात्मक आदेश दि. 20/04/2023 रोजी काढण्यात आला आहे.