अमळनेर- लोक न्यूज
राज्यात भाजप व शिंदे सरकार विराजमान असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कृपादृष्टी आता अमळनेर मतदारसंघावर पडली* असून या सरकारने आपल्या मागणीची दखल घेऊन शहरात *सौर पथदिव्यांसाठी 3 कोटी निधी मंजूर केला* असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.
संपूर्ण 1 ते 18 प्रभागात हे सौर पथदिवे लागणार असल्याने या पथदिव्यांमुळे वीज गेल्यानंतर देखील आपले शहर लखलखणार असल्याचे शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबतचा शासन आदेश दि 19 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून यामाध्यमातून अमळनेर शहरासाठी सौर पथदिव्यांसाठी 3 कोटींचा निधी मिळाला आहे.यासंदर्भात शिरीष चौधरी यांनी दि 1 मार्च 2022 रोजी अमळनेर शहरातील संपूर्ण 18 प्रभागात सौ पथदिवे बसविण्यासाठी 3 कोटी निधीस मंजुरी मिळावी अशी मागणी लेखी पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती शिरीष चौधरी यांनी देत सदर निधी दिल्याबद्दक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सर्व रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत 15 ते 20 कोटी मिळणार असल्याची माहिती शिरीष चौधरी यांनी दिली असून यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
