लोक न्यूज-
आज दि 21/04/2023 वार शुक्रवार रोजी जि.प. उच्च प्राथ. शाळा देवगांव-देवळी येथे दुपारी 12.50 वा. शाळा सुटल्यानंतर इ-7 वी च्या वर्गात शॉट सर्किटमुळे आग लागली वर्गखोलीमधून धूर येत असल्याने शाळे समोरी रहिवाशी श्री रविंद्र नवल पाटील यांनी शाळेकडे धाव घेतली वर्गखोलीतील विद्यार्थी लॉकर (फायबर कपाट) जळत होते त्यांनी गावातील ग्रामस्थांना शाळेत बोलवून वर्ग खोली विझवली. गावातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन व नगरपालीका येथे फोन लावून अग्नीशमन यंत्रास कळविले.
त्यापूर्वी शाळेतील 21 फायबर बेंच,एक फायबर  कपाट पुर्णपणे जळाले असून दुसरी कपाट अर्धवट जळाली आहे. वर्गातील पृथ्वीगोल, दोन फुटबॉल, एक लाकडी बॅट, दोन पंखे,कागद पत्रे  जळून खाक झाले आहे.अग्नीशमन यंत्राच्या सहाय्याने पाणी मारून आग पूर्ण विझवली.सर्व जळालेल्या वस्तूंचा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांन समोर पंचनाम केला आहे.