अमळनेर : लोक न्यूज
कळमसरे ता. अमळनेर येथील माजी सरपंच मनिषा महाजन, बांधकाम व्यावसायिक तथा माजी उपसरपंच मुरलीधर महाजन यांची कन्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे )यांना मॅथेमॅटिक्स विषयामध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
नेहा महाजन या संकेत रामकृष्ण भंगाळे
यांची पत्नी व जळगाव येथील नंदिनीबाई मुलींचे विद्यालय येथील शिक्षिका जयश्री रामकृष्ण भंगाळे व निवृत्त लिपिक रामकृष्ण सिताराम भंगाळे यांची सुन आहे.
नेहा महाजन यांना या संशोधन कार्यासाठी त्यांना गाईड म्हणून डॉ. नरेंद्र स्वामी यांचे  मार्गदर्शन लाभले. तसेच को-गाईड म्हणून कळमसरे ता.अमळनेर येथील रहिवासी तथा आर्ट्स, कॉमर्स,सायन्स कॉलेज चिखलदरा येथील प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
नेहा  मुरलीधर महाजन (भंगाळे ) यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. पती संकेत रामकृष्ण भंगाळे यांचाही  मॅथेमॅटिक्स विषय असल्याने त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कळमसरे येथील पहिली सुकन्या नेहा महाजन (भंगाळे )पी. एच. डी.  झाल्याने तीच्यासह आई, वडील, पती, सासू सासरे यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.