अमळनेर-लोक न्यूज
इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, अमळनेर येथील जुनैराह नविद शेख या सिनीयर केजीत शिकणाऱ्या अवघ्या साडे चार वर्षाच्या चिमुकलीने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.
विश्वनिर्मात्या अल्लाहप्रति कृतज्ञ बनण्याच्या प्रवासात हे त्याचे पहिले पाऊल असून, इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्याने सिद्ध केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
२४ मार्च पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, दिव्य कुरआन १४४४ वर्षांपूर्वी याच महिन्यात अवतरीत झाल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेऊन अल्लाहप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात.
हे रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिम बांधवांवर अनिवार्य असले तरी लहान मुले, वृद्ध, रुग्ण, गरोदर महिला, बाळंतीण आणि प्रवाशांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र लहान मुलांना ईशपरायण आणि संस्कारक्षम व्यक्ती बनविण्यासाठी त्यांना बालवयापासूनच प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने रोजा ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
रमजान महिन्यातील उपवास हे ईशकृतज्ञ होण्यासाठी आवश्यक आणि संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न व्यक्ती होण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग असल्याचे मानले जातात.
या प्रशिक्षणामध्ये अमळनेर येथील जुनैराह नविद शेख या सिनीयर केजीत शिकणाऱ्या अवघ्या साडे चार वर्षाच्या चिमुकलीने संपूर्ण महिन्याचे रोजा ठेऊन अल्लाहप्रति/ईश्वराप्रति कुतज्ञ होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली असून, भविष्यात संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न व्यक्ती होण्याच्या मार्गात पहिले पाऊल ठेवले आहे.
दरम्यान आजोबा यांच्या नकारानंतरही ३८ तापमान असलेल्या कडक उन्हाळ्यात सकाळी ४.५५ ते संध्याकाळी ६.५२ मिनिटांपर्यंतकच्या तब्बल १४ तासांच्या निर्जल्य पद्धतीचा रोजा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि गावातील मित्र परिवार त्यीचे कौतुक करत आहेत.
