वैजापुर- लोक न्यूज
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा संस्कृतीक
मन्डळ च्या मैदानावर पुढिल मे महिन्याच्या रविवार( ता, १४ मे,)रोजी राज्य स्तरीय वीर शिरोमनी हिंदवी सुर्य महाराणा प्रतापसिंह सकल राजपूत/परदेशी मेळावा होणार आहे,या मेळाव्यात भारत सरकारचे संरक्षण मंत्री ना,राजनाथसिंह ,तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना, एकनाथराव शिंदे,उप मुख्यमंत्री ना,देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने बुधवार(ता,१९)रोजी रात्री आठ वाजता तालुक्यातील शिवगाव,पाथ्री येथील सकल राजपूत समाज व गावकरी बंधू-भगिनींची जनजागृती बैठक घेण्यात आली,या मेळाव्या बाबत माहिती देण्यात आली,संभाजीनगर कोअर कमेटीचे डॉ,जीवन राजपुत,भगवानसिंह डोभाळ,वैजापुरर्चे सामजिक कार्यकर्ता धोंडीरामसिंह
राजपूत,मुख्याधिकारी भागवत बिघोत,यानी उपस्थित
बंधू-भगिनी याना या मेळाव्या बाबत व शासनाकडे करावयाच्या मागण्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करुन
या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त राजपूत-परदेशी बंधू भगिनी यानी येण्याचा संकल्प केला,या प्रसंगी प्रेमसिंग राजपूत, सुभाष गोमलाडू, प्रमोद ऊसारे,पार स बहरे वैजापूर,शिवगाव -पाथ्री येथील ग्रामपंचायत सदस्य विजयसिंग जारवाल,मदन गोमंलाडू,रामसिंग जारवाल,कांतीलाल दुमाले,मधू डुमाले,प्रेमसिंग गोमंलाडू,भीमसिंग राजपूत व समस्त गावकरी मोठ्या सन्खेने उपस्थित होते.
