वैजापूर- लोक न्यूज
महाराष्ट्र शासन च्या शासकीय न्याय व विशेष सहाय्य विभाच्या"सामाजिक न्याय पर्व अभियान",अंतर्गत डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येथील शासकीय निवासी शाळा व डॉ,बाबासाहेब मागास वर्गीय वसतिगृह येथे शुक्रवार(ता,१४)रोजी सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला, सदरील कार्यक्रम या खात्याचे आयुक्त सुमंत भांगे,प्रशांत नारनवरे विभागाच्या श्रीमती जयश्री सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले, श्री धोंडीराम राजपूत यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत शिक्षणाचे महत्व विशद करीत,भारतीय संविधान बाबत माहिती,डॉ, आंबेडकर यांचे ग्रंथ हेच गुरू या विषयी माहिती विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रश्न विचारीत दिली,व शासनाच्या सवलती व योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले,डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची १४एप्रिल ही जयंती सण ,उत्सव म्हणून साजरी करून भारतीय संविधान प्रत्येक घरात ठेऊन त्याचे अभ्यासपूर्ण वाचन करावे असेही विशद केले,या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस,आर, भामरे होते,कार्यक्रम प्रस्तावना श्री ,गव्हाणे यांनी केली,मुलांच्या वसतिगृह चे गृहपाल श्री, सुलाने यांनी ही मार्गदर्शन केले,या प्रसंगी श्रीमती निकाळे, श्री भागवत,यांच्या सह शिक्षक वृंद,व मुलेमुली मोठया संख्येने उपस्थित होते.
