वैजापूर-लोक न्यूज
समाजातील देह विक्री करणाऱ्या महिलांनी आपला व्यवसाय करीत असताना समाजाचे सामाजिक स्वास्थ्य व समाजाचे स्थैर्य बाधित होणार नाही याचे भान पदोपदी ठेवावे व स्वतः च्या आरोग्यसह आपल्या मुलां-बाळाच्या आरोग्याची व त्यांच्या शैक्षणिक उन्नतीची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वैजापूर,गंगापूर, कन्नड  तालुक्यातील देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(ता,१०)रोजी वैजापूर येथे प्रेरणा सामाजिक संस्था द्वारा आयोजित कार्यक्रमात केले,ते पुढे म्हणले की,देह विक्री करणाऱ्या महिलांनी आपली आरोग्य तपासणी दर तीन महिन्यांनी करून आरोग्याची काळजी घ्यावी,या प्रसंगी ऍड,नुसरत सय्यद बेगम यांनी ही महिलांना स्वतः च्या आरोग्य बाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले ,प्रेरणा सामाजिक संस्था राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी,(मुंबई,) जिल्हा एड्स नियंत्रण पथक (छत्रपती संभाजीनगर ) यांच्या सहकार्याने एच,आय,व्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राबवित आहे,त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित केला आहे, या तिन्ही तालुक्यात जवळपास दोन हजार देह विक्री करणाऱ्या महिलाची नोंद आहे, या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हा मेळावा आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हा मेळावा आयोजित केला,या प्रसंगी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या पायल मोंदेकर(नागपूर),रिनाखान(अमळनेर,आधार)यांनीही महिलांना मार्गदर्शन केले,शरद शिंदे प्रकल्प अधिकारी व उपजिल्हा रुग्णालय वैजापूर च्या वैद्यकीय अधिकारी डॉ,दीपमाला मरमट,व आयसीटीसी उप जिल्हा रुग्णालयचे शशिकांत पाटील यांनी ही मार्गदर्शन केले,सूत्र संचलन साईनाथ बारगळ यांनी केले,राजेंद्र लाटे, हिंदोळे,  मनीषा, बापू वाकळे, कडूबाई ,आस्मा शेख, यांनी सहभाग नोंदविला