वैजापूर- लोक न्यूज
 राज्य शासन  व मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांची काल १३मार्च रोजी जुन्या पेंशन बाबत बोलणी फिस्कटल्याने वैजापूर येथील शासकीय व निम शासकीय कार्यालयेचे कर्मचारी जि, प,शाळा व न,प, शाळांचे शिक्षक मंगळवार(ता,१४)पासून बेमुदत संपावर गेले आहेत,न, प, शाळा १९आहेत या शाळेतील सर्व शिक्षक संपावर गेले त्यापूर्वी त्यांनी मुख्यधिकारी  भागवत बिघोत यांना निवेदन दिले व संपावर गेले या समयी त्यांच्या समवेत तालुका पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत  व बबन क्षीरसागर यांनीही उपस्थित राहून संपावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी केली, नगर परिषद शिक्षक भारती शाखेचे सी,पी पाटील, किशोर साळुंकर,सर्वश्री वाघ, रावकर,कुमावत ,वैद्य, उसारे यांनी  घोषणा देत"एकच मिशन जुनी पेंशन" अशी जोरदार मागणी केली,हम सब एक है अशाही घोषणा दिल्या,पंचायत समिती समोर शिक्षक भारती संघटनेचे शिक्षक वृंद,व कर्मचारी वृंद यांनी सभा घेऊन जुन्या पेंशन ची जोरदार मागणी केली,येथे ही श्री राजपूत यांनी कर्मचारी मागणी जुनी पेंशन मिळाली पाहिजे या मागणीला  पेंशनर्स संघटनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले,या प्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप,राज्य कोषाध्यक्ष किशोर कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय गायकवाड, सचिव अनिल जगदाळे,विशाल तांबे,अनिल नाईकवाडी, रवी अनर्थे,संतोष सोनवणे,
गणेश रोठे यांची उपस्थिती होती.