वैजापूर-लोक न्यूज

आजची महिला उद्याची या देशाची भावी पिढी घडविणारी उत्तम शिलेदार तेंव्हाच बनू शकते जेंव्हा ती राजमाता जिजाऊ सारखे सुसंस्कार आपल्या मुलां-बाळावर करून आदर्श मुलगा-आदर्श मुलगी घडवू शकते व आजची उत्तम शिलेदार बनू शकते,असे प्रतिपादन वैजापूर उपविभागांच्या उप विभागीय पोलीस अधिकारी  आय,पी,एस श्रीमती महक स्वामी यांनी सोमवार रोजी आयोजित महिला मेळाव्यात काढले,त्या पुढे म्हणाल्या की,महिलाच्या हितासाठी ,रक्षणासाठी, व  महिलांवरीलअन्याय अत्याचार याच्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी  सरकाने महिला हिताचे अनेक कायदे काढले त्याचा लाभ घेतला पाहिजे, महिला सक्षम व सुदृढ झाली पाहिजे,असेही त्या पुढे म्हणाल्या प्रमुख पाहुणे समाज कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत होते ते म्हणाले की,महिलाना
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिलेली आहेत, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे व मुलींना ही पूर्ण शिक्षण द्यावे,मुलीच्या जन्माचे स्वागत करावे,संस्कार व संस्कृती, नीती मूल्ये याचे पालन करावे, मुलींनी आपल्या मात पित्याची मान समाजात खाली झुकेल असे कोणतेही गैर वर्तन टाळावे असे ही त्या पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ,प्रतिमा सोनवणे होत्या,त्यांनी ही महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले,निर्मला इन्स्टिट्यूट ने आयोजित केलेल्या या महिला मेळाव्यात  ग्रामीण भागातील महिला व मुली मोठया संख्येने आल्या होत्या त्यांनी महिला जन जागृती साठी  गीते,नाटिका, ओव्या,जात्यावरील गीते सादर केली,या प्रसंगी सिस्टर मार्गारेट,नॅन्सी रोद्रीग्ज, छाया बंगाळ,इरफान सय्यद, यांनी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले.