वैजापूर-लोक न्यूज
आजची बालके उद्याची या महान व विशाल राष्ट्राची खरी संपत्तीआहे,ही पिढी सक्षम,सुदृढ ,निकोप, निरोगी रहावी व एक जबाबदार व आदर्श नागरिक घडावीत म्हणून विजेता स्पोर्ट्स असोसिएशन द्वारे त्यांना मिळणारे ज्यूदो,कुंग फु कराटे ,धनुर्विद्या इत्यादी चे प्रशिक्षण त्यांच्या जीवनाला अत्यंत उपयुक्त व दिशा देणारे ठरणार आहे तसेच देशाच्या हिताचेही असणार आहे असे प्रतिपादन से,नि, शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,१९)रोजी येथील मौ,आझाद विद्यालयात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गाला भेट दिली असतांना केले,ते पुढे म्हणाले की,आई,वडील,शिक्षक यांची आज्ञा पालन हे आपले आद्य कर्तव्य असावे, या समयी या असोसिएशनचे चे अध्यक्ष निलेश नरवडे पाटील यानी श्री राजपूत यांचे स्वागत,केले,मुले -मुली मिळून जवळपास पन्नास विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे, निलेश नरवडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे असेही राजपूत शेवटी म्हणाले,त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
