वैजापूर-लोक न्यूज
मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे डब्यात गरोदर असलेल्या महिलेला रेल्वे डब्यातच रविवार(ता,१९)रोजी अचानक पोटात कळा येऊ लागल्या ,रेल्वे धावत आहे,महिला सारखी पोटातील प्रसूतीच्या कळानी विव्हळत अशा समयी कुणाला काहीच सुचेना त्याच समयी एक डॉक्टर ही त्याच डब्यात प्रवास करीत होते ते देवदूता सारखे धावून आले त्यानी व द,म,रे,च्या तिकीट तपासनी पथकाने व काही महिलांच्या मदतीने त्या महिलेची प्रसूती सुव्यवस्थित केली,पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर महिलेला व बाळाला उतरून येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले,कठीण समयी डॉक्टर रुपात देवदूत धावून आला याची पुन्हा एकदा प्रचीती आली असे प्रवासी बोलत आहेत.
