लोक न्यूज-
दि 26/3/2023 -अमळनेर आगामी येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक 2023 संदर्भात आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातील ग्रामीण पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची "इंदुमाई "निवासस्थानी किरणगीर भरतगीर गोसावी उपाध्यक्ष राजमाता जिजाऊ सहकारी सूतगिरणी अंमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली दि 24/3/23 रोजी ठीक साय 5.00 वा बैठकआयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर निवडणुकी पॅनल लढविण्याबाबत विचार विनिमय सल्ला तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली .या चर्चेत बरेच कार्यकर्ते हे देखील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी असल्याने आम्ही इच्छुक उमेदवार आहोत अशी कबुली देऊन उमेदवारी करण्याबाबत स्पष्ट चिन्हे दर्शवली तसेच उमेदवार म्हणून नाव नोंदणी देखील करण्यात आली याप्रसंगी असंख्य इच्छुक उमेदवारांची नावे देखील नोंदवण्यात आली आहेत अंतिम बैठकीच्या अध्यक्षांनी या व्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांनी आपले नावे व संपर्क नंबर सह आपण कोणत्या राखीव वर्गातून निवडणूक लढविणार आहात याबाबत7875055333 आणि 954519 2399 या नंबरवर संपर्क साधून प्रत्यक्ष माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असे ही नमूद केले याप्रसंगी किरण गोसावी ,किशोर पाटील ,सुदाम चौधरी, सुभाष पाटील, रमेश पाटील, रामकृष्ण पाटील, भास्कर चौधरी, रमेश चौधरी, सुरेश पाटील, मच्छिंद्र पाटील ,प्रवीण महाजन ,अनिल महाजन ,नाना देसले ,रोशन सूर्यवंशी, रणछोड पाटील, राकेश पाटील, गुलाबराव पाटील ,अरुण पाटील, स्वप्निल ठाकरे ,लादू महाजन, मनोज पाटील, मनोहर महाजन ,उमेश पाटील योगेश पाटील ,गजानन पाटील ,नितीन पाटील ,चंद्रकांत पाटील ,केदार राजपूत ,संतोष चौधरी ,गणेश गुरव, पंकज धनगर ,प्रफुल्ल पाटील यासह कार्यकर्ते पदाधिकारी होते
