धुळे-लोक न्यूज
महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव घेण्यात आला. सदर महोत्सव 24 मार्च ते 26 मार्च 2023 पर्यंत नंदनवन प्रॉपर्टी पंचायत समिती समोर सुरू होता. धुळे जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन येथे सुरू होते. सदर समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी सदर प्रदर्शनात समाविष्ट झालेल्या महिलांनी आपापली मनोगत व्यक्त केली. ज्या महिलांना बँकेची स्लिप भरता येत नव्हती त्या महिलांना उद्योग व्यवसाय पर्यंत नेऊन पोचवण्याचं माध्यम म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे असे महिलांनी आपल्या मनोगतत्न व्यक्त केले. काही महिलांनी नवतेजस्विनी महोत्सव महिलांचं व्यासपीठ हे निरंतर चालू राहावे अशी सूचना वजा विनंती केली. सदर समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी श्री. संदीप मराठे सर जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे, श्री गणेश खोंडे सर, प्रकल्प व्यवस्थापक महानगरपालिका धुळे, श्री ईश्वर पाटील एम एस आर एल एम विभाग प्रमुख, श्रीमती सीमा साळवे धुळे सीएमआरसी सचिव इत्यादी पदाधिकारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गणेश खोडे सर म्हणाले की महिलांना उद्योजक बनवण्यासाठीच प्रभावी माध्यम म्हणजे नव तेजस्विनी महोत्सव महिला बचत गटांचे विक्री प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शन येत्या दोन महिन्यात परत एकदा महानगरपालिकेतर्फे भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचे आमचाही मानस आहे असे प्रतिपादन त्यांनी सदर कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप जी मराठी सर यांनी आलेल्या सर्व स्टॉल धारकांचे आभार मानले व भविष्यात पुढेही आपल्याला मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठीच सदर प्रशिक्षण घ्यावयाचे आहेत. त्याच्यात आपल्या सर्व सहभागी महिलांचा सहभाग अपेक्षित आहे तरच कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन संदीप जी मराठे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भूषण ब्राम्हणे कल्पतरू सीएमआरसी व्यवस्थापक यांनी केले.