लोक न्यूज-
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडी स्थापन करून आपआपल्या पक्षातील एकूण व्यूहरचना बाबत आज माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी संदर्भात बंददार चर्चा झाली. यावेळी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना(उबाठा) चे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे उपस्थित होते.

आमदार अनिल भाईदास पाटील वैद्यकीय कारणासाठी मुंबईत असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून बैठकीला उपस्थिती दर्शवली. यावेळी महाविकास आघाडी संदर्भांत सर्वाधिकार माजी आमदार कृषिभूषण साहेबराव धोंडू पाटील यांना देण्यात आले आहेत.
     
महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी आपले नामांकन भरून ठेवावे, मात्र त्यावर छाननी नंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते.

आजच्या बैठकीस उपस्थित तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमळनेर मा.गोकुळआबा बोरसे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर मा.सचिन बाळू पाटील, खा.शी.मंडळ संचालक डॉ.अनिल शिंदे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.सुलोचना ताई वाघ, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, मा.शेतकी संघ मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रा.सुरेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा गट मा.विजय काशिनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस मा.संदीप घोरपडे , मा. नगरसेवक मनोज पाटील, विक्रांत पाटील, श्याम पाटील, तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा गट मा.श्रीकांत अनिल पाटील, चेअरमन बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गणेश भामरे, भूषण पाटील आदी उपस्थित होते ..!