वैजापूर- लोक न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्य निर्मिती करण्या
साठी अत्यंत नियोजन पध्दतीने व दूरदृष्टी समोर ठेऊन अगदी बालपणापासून सवंगडी जोडून व पुढे विश्वासू माणसे जोडून रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा,विशाल जी गायकवाड यांनी वैजापूर येथे आयोजित शिव जयंती कार्यक्रमात केले,शिवक्रांती सेना महाराष्ट्र राज्य च्या वतिने हा कार्यक्रम रविवार(ता,१९)रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला होता,या प्रसंगी आ,प्रा,रमेश पा,बोरनारे,माजी आमदार
भाऊसाहेब पा,चिकटगांवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी,पो,नि, संजय लोहकरे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,प्रशांत पा, सदाफळं, कल्याण दांगोडे,सचिन वाणी, दिनेश राजपूत, पारस घाटे,कल्याण दांगोडे,यांची प्रमुख उपस्थिती होती,शिवक्रांती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुनील बोडखे, प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ मगर,तालुका अध्यक्ष दादा भाऊ घायवट,यांनी पाहुण्यांचे शाल टाकून स्वागत केले,प्रास्ताविक सोमनाथ मगर यांनी केले ,सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यानी तर आभार सुनील बोडखे यांनी मानले.

