वैजापूर-लोक न्यूज
भारताचे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंती निमित्त रविवार(ता,१९)रोजी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जलाभिषेक व दुग्धभिषेक करून शिवाजी महाराजांना सर्व वैजापूर वाशियानी  मानाचा मुजरा करीत अभिवादन केले, आ,प्रा,रमेश पा,बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपनगराध्यक्ष साबेरखान, यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमात वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती महक स्वामी,तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत सदाफळ,भाजपा तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे,शहर अध्यक्ष दिनेश राजपूत, गटनेते दशरथ बनकर, शिवसेना प्रमुख राजेंद्र पा,साळुंके,सचिन( बंडू )वाणीपंकज ठोंबरे,हिंदवी स्वराज प्रतिष्ठानचे सर्वश्री ,विशाल संचेती,पारस घाटे, सुनील बोडखे यांनी जलाभिषेक केला ,सूत्र संचलन व आभारधोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले, जलाभिषेक झाल्यानंतर श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्थापित करून उपस्थितानी अभिवादन केले,या समयी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्वश्री शैलेश चव्हाण, तेजस जगताप,सोमु सोमवंशी,प्रवीण कोतकरशेखर मगर,श्रीराम गायकवाड,सचिन दाढे, वल्लभ सोनवणे,रोहित गुळस्कर,प्रमोद कोतकर,नितीन तांबे,महेंद्र काटकर,भावलाल सोमासे,शेख अखिल,उल्हास ठोंबरे,यांच्या सह शहरातील सर्व थरातील मान्यवर यांनी उपस्थित राहून श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले,सायंकाळी पुतळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  कार्य कर्तृत्व ची गाणी वाजवून नाचून व गाऊन त्यांच्या स्मृतींन अभिवादन करण्यात आले.