लोक न्यूज-
सकाळी ११-३०पर्यँत उपस्थित न झाल्याने पेंशनर्स ना वाट पहावी लागली एक तारखेला पेंशन मिळते म्हणून पेंशनर्स येथील बँक
ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत बुधवार(ता,०१) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून येऊन बसले परंतु या बँकेचे रोखपाल सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत आले नाहीत कॅशिअरला लवकर बोलवा वृद्ध लोक जास्त वेळ बसू शकत नाही हे सांगण्यासाठी पेंशनर्स संघटनेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत व वृद्ध पेंशनर्स यु,के,पुणे,पी,आर,राजपूत,विठोबा जगताप मॅनेजर कडे गेले परंतु त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली व अपशब्द वापरून या जेष्ठांचा अपमान केला श्री राजपूत यांनी तात्काळ मुख्य शाखा पुणे व विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनीही फोन घेतला नाही,शेवटी त्यांनी या दोन्ही ठिकाणी मेल द्वारे तक्रार दाखल केली, पुणे व औरंगाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन,दर महिन्याला कॅशिअर पेंशनर्स व जेष्ठ नागरिकांची अशीच अडवणूक करतात या बाबत त्वरित दखल घ्यावी,अशी राजपुत यांनी विनंती केली,

