लोक न्यूज-
अमळने लायन्स क्लबचे सेवाव्रत निश्चितपणे उल्लेखनीय अनुकरणीय आहे.लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या दूरदृष्टीतून व सेवाभावी वृत्तीतून सर्व देश मोतीबिंदू त्रास मुक्त करण्याचे मिशन आम्ही सुरू केले आहे.रुग्णांनी त्यांच्या मदतीसाठी मला केव्हाही साद घाला मी शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद देईल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

     लायन्स क्लब आयोजित भव्य एक्सपोचा शानदार उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते,अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, डॉ.बी.एस.पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील,ख्यातनाम बिल्डर ओमप्रकाश मुंदडे,  उपस्थित होते.       
         एक्सपो मध्ये खाद्यपदार्थांचे ४५ तर विविध उद्योजक,व्यावसायिक व संस्थांचे ५० पेक्षा जास्त स्टॉल आहेत. त्यात स्थानिक,राज्य तथा परराज्यातून अनेकांनी सहभाग घेतला आहे.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी लायन्स क्लब करत असलेल्या सेवा कार्याचे  मुक्तकंठाने प्रशंसा केली.यावेळी मंत्री गिरीश महाजन व आ.अनिल पाटील यांनी केलेल्या राजकीय फटकेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.