लोक न्यूज-
खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता अमळनेर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत माननीय खासदार उन्मेश दादा पाटील यांना मुंबई सेंट्रल दोंडाईचा (09051/52) ही गाडी  पाळधी किंवा जळगाव पर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते यासंदर्भात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना. रावसाहेब जी दानवे व मा.ना दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व वार्तालाप केला होता.
 त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.

 
अमळनेर रेल्वे सल्लागार समिती
 सदस्य (पश्चिम रेल्वे)