वैजापूर-लोक न्यूज
स्त्री उन्नतीच्या आधारवड राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले
यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत महिला सक्षमीकरण व स्वावलंबन साठी महिलांना ब्युटी पार्लर,ड्रेस मेकिंग,
केक ,बेकरी व मसाले ,मिरची पावडर तयार करणे इत्यादी चे एक महिना कालावधीचे प्रशिक्षण वर्ग सोमवार(ता,,०२) रोजी सुरू झाला,महामाया आधार सेवाभावी संस्था औरंगाबाद व जे,के,जाधव  महाविद्यालयच्या वतीने चालणाऱ्या या वर्गाचे उदघाटन प्राचार्य फादर संजय ब्राम्हने,जे, के,जाधव व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत झाले, एक महिना चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात पन्नास हुन अधिक महिला सहभागी झालेल्या आहेत,जाधव,व राजपूत यांनी या महिलांना विविध पदार्थ तयार करण्याचे  प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे असे आवाहन केले, या प्रसंगी प्राचार्य
भिंगार देव,पंकज साळुंके,महामाया सेवा भावी संस्थेचे राजकुमार कांबळे, श्रीमती उगले मॅडम,यांची उपस्थिती होती.