वैजापुर- लोक न्यूज
मानवाला मानव म्हणून जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, यास्तव महिला आणि पुरुष वर्गाने शिकून आपल्या कुटुंबातील सर्वांना शिक्षण प्रवाहात आणावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी  मंगळवार(ता,०३)रोजी स्त्री उन्नतीचा आधार वड असलेला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या१९२व्या जयंती दिनी  महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात सावित्रीबाई फुले याना अभिवादन करतांना केले,स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ सावित्रीबाई नी रोवली
म्हणून आज महिला विविध क्षेत्रात पुरुषापेक्षा जास्त अग्रेसर आहेत, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जाते, सर्वप्रथम नगरसेविका डॉ,प्रीती भोपळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्याच्या समवेत श्रीमती शिंदे व श्रीमती ढाकरे होत्या,गटनेते नगरसेवक दशरथ बनकर,फुले -शाहू,-आंबेडकर जयंती चे अण्णासाहेब ठेंगडे,जेष्ठ नागरिक काशिनाथ गायकवाड,बाबासाहब गायकवाड,सजन गायकवाड, रतीलाल गायकवाड, समता परिषद चे श्री शिंदे,जगन गायकवाड,डॉ,परेश भोपळे,कुमोद जेजुरकर,अशोक अप्पा पवार,मराठा सेवा संघाचे मोती वाघ,दिलीप अनर्थे,बाबासाहेब
जगताप, प्रकाश माळी,से,नि, जवान गौतम गायकवाड,श्री देबकर,श्री ,वाकळे, शशिकांत भालेराव,राजेश गायकवाड,गिरीश भालेराव,पारस घाटे,श्री,बनकर,सुरेश तांबे, संतोष गायकवाड,राधेश्याम जगताप,ज्ञानेश्वर घोडके,स्वप्नील जेजुरकर व शहरातील मान्यवर उपस्थित होते,आपल्या सवडीनुसार आ,रमेश बोरनारे
यांनी येऊन अभिवादन केले,सूत्र संचलन जगन गायकवाड यांनी केले आभार दिलीप अनर्थे यांनी केले.