वैजापूर-लोक न्यूज
वाढदिवसाच्या खर्चिक कार्यक्रमला फाटा देत त्याची सर्व रक्कम समाजातिल तळा गाळातील ,गोर,गरीब, नागरीकांच्या  मोफत आरोग्य तपासणी साठी व उपचार शिबीर साठी खर्च करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारे साहिल बॅटरी चे साबेर अशरफखान यांनी रविवारी(ता,०१)रोजी समाजाला आदर्श घालून सामाजिक भान ठेवले त्याबद्दल आ,रमेश पा,बोरनारे ,व सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी  त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेंआवाहन रविवार रोजी आयोजित मोफत आरोग्य तापसणी व उपचार शिबिरात केले,साबेर, साहिल बॅटरी,शाहनवाज
मित्र मंडळ व आनंद हॉस्पिटल वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर नववर्ष दिनी घेण्यात आले,या शिबिरात २७७ रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले,तज्ज्ञ डॉ,अभिजित अन्नदाते,डॉ,अमोल अन्नदाते व त्यांच्या चमूने  सहा तास रुग्णांची तपासणी केली ,या प्रसंगी  माजी नगराध्यक्ष बाळासाहब संचेती,उपनगराध्यक्ष साबेरखान,माजी उपनागराध्यक्ष मजीद कुरेशी,अखिल
शेख, माजी सभापती बाबासाहेब जगताप,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर,दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, गोकुळ भुजबळ, हिकमतउल्ला,अल्ताफ बाबा, आमिर अली, सलीम वैजापूरी, यांची प्रमुख उपस्थिती होती आयोजक साबेर अशरफखान,(साहिल बॅटरी) शाहनवाज शाह, जाकीर कुरेशी,बाबा शेख,काजीम पटेल,अतिक शेख,अब्बू शेख,जरू सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले,सूत्र संचलन व प्रास्ताविक धोंडीराम ठाकूर यांनी केले आभार साबेर अशरफखान यानी मानले.