वैजापूर-लोक न्यूज
जे,के जाधव महाविद्यालय वैजापूर व फर्स्ट जॉब फाउंडेशन ,डीस्टिल एज्युकेशन यांच्या संयुक विद्यमाने येथील। करुणा निकेतन  शाळेत सोमवार(ता,०२)
रोजी मोफत भव्य नौकरी महोत्सव घेण्यात आला ,या महोत्सवात तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व बेरोजगार खूप मोठ्या संख्येने आले होते,यांच्या साठी औरंगाबाद हून अकरा विविध कंपनीचे अधिकारी आले होते त्यांनी या बेरोजगार युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध जागा बाबत माहिती दिली, व जे पात्र होते त्यांना जॉब उपलब्ध करून दिले,
या महोत्सवाचे उदघाटन माजी नगरसेवक  मर्चंट बँकेचे प्रमुख बाळासाहेब संचेती,वैजापूर चे उद्योजक
शांतीलाल पहाडे, यांनी केले ,करुणा निकेतन शाळेचे मुख्याध्यापक फादर संजय ब्राह्मणे,माजी उद्योग संचालक जे, के,जाधव व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती,
प्रास्ताविक   सूत्र संचलन श्री, ठाकूर यांनी केले, श्री जाधव श्री, संचेती, श्री पहाडे यांनी नौकरी च्या शोधात
आलेल्या मुलां-मुलींना या संधीचे सोने करण्याचे आवाहन करून कंपनीच्या अधिकारी वर्गाला युवकांना सामावून घेण्याचे आवाहन केले,
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य भिंगारदेव,उप प्राचार्य सुनील कोतकर,ग्रंथपाल प्रा,पंकज साळुंके,प्रा,एफ,एम,गायकवाड, मंगेश भागवत,पी,बी,पाटील ,दीपक आवारे,नारायण मगर,सर्वश्री झिंझुरडे,राऊत,खरात यांनी सहभाग नोंदविला.