लोक न्यूज-
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हीकल मिशन २०२३ आयोजित केले आहे .१९ फेब्रुवारी २०२३ ला तामिळनाडूतील पत्तीपुरम येथून १५० पिको सॅटॅलाइट हे परत वापरले जाणारे रॉकेट सह  प्रक्षेपित होणार आहेत. सदर चे रॉकेट हे उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पराशुट च्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहे .हे रॉकेट परत पुढील मिशन साठी वापरता येईल असा प्रयोग सर्व प्रथम अमेरिकेमध्ये एलोन मास्क यांनी केला होता.संपूर्ण जगात विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० पिको सॅटॅलाइट आणि परत वापरता येणारे रॉकेट सह प्रक्षेपण असा  जगातील पहिला च शैक्षणिक प्रयोग आहे त्यामुळे या प्रकल्पाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे प्रशस्ती पत्र दिले जातील. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास पिको उपग्रह आणि रॉकेट बनविण्यासंबंधित दहा दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे .उपग्रह बनविण्यासाठी   पुणे ,नागपूर आणि परभणी   येथे विद्यार्थ्यांची कार्यशाळा लवकरच आयोजित केली जाणार आहे. तसेच मेरिट मध्ये येणारे १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवतील .हा प्रकल्प कलाम  यांचे स्वप्नपूर्तीसाठी डॉ एपिजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम् तामिळनाडू या संस्थे मार्फत भारतभर राबवला जात आहे 


यासाठी  श्री.एन.टी.मुंदडा ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थिनी डॅफोडील जगदीश सोनवणे  सहभागी होत आहेत.