लोक न्यूज-
शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन -2022-23
दिनांक ३०/१२/२०२२ शुक्रवार रोजी  विजय नाना पाटील आर्मी स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, अमळनेर येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन अतिशय उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे श्री.एस.ए.बाविस्कर सर( माध्य.शिक्षक, रोटवद) यांच्या हस्ते करण्यात आले.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पी. एम. कोळी सर तर  प्रमुख अतिथी  म्हणून सुभेदार मेजर श्री. नागराज एच. पाटील सर यांनी आपले स्थान भूषवले. अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.
     प्रमुख वक्ते म्हणून विज्ञान शिक्षक श्री.संजय पाटील सर व विज्ञान शिक्षिका सौ. प्राजक्ता शिंदे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
               या प्रसंगी श्री. शरद पाटील सर यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सन्मान, तर श्री. आर ए घुगे सर यांना छञपती क्रीडा गुणगौरव पुरस्कार  मिळाल्याने अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन श्रीमती ललिता भोंडेकर मॅडम,
प्रास्ताविक श्री संदीप वाघ सर 
अतिथी परिचय : श्री गोपाल हडपे सर यांनी
तर आभार : श्री. के एच.कोळी सर यांनी मानले. सोबत सर्व विज्ञान शिक्षक श्री .कापडे सर,खंडारे सर, मालचे सर, श्री. शिवाजी पाटील सर आणि श्री.महेश बोरसे सर व इतर शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
       जवळजवळ १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ३८ प्रोजेक्ट सादर केले. आणि नंतर  विज्ञान प्रदर्शन इतर सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.दिनांक ३१/१२/२०२२,शनिवार रोजी पालकांसाठी देखील प्रदर्शन खुले करण्यात आले होते.