वैजापूर-लोक न्यूज
भारतीय सांस्कृतिक इतिहासात भारताच्या प्राचीन कला दडलेल्या आहेत त्या कला जोपासण्यासाठी देशातील सामाजिक,शैक्षणिक ,व सांस्कृतिक कला जोपासणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन हा भारताचा
वारसा जपावा असे आवाहन से,नि, शिक्षणाधिकारी
धोंडीरामसिंह राजपूत यांनी नववर्ष दिनी आयोजित कठपुतली प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी येथील शिव उमा बहुउदेशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने कठपुतली प्रशिक्षण वर्गात केले,या वर्गात अशोक मांजरे यांनी मुलांना कठपुतली ,बाहुल्या कशा बनवाव्या याविषयी प्रशिक्षण दिले,वयोगट१०ते१५ मधील मुले यांना केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालय च्या वतीने प्रतिमाहं₹३००-००तर १८ते२५वयोगटातील मुलामुलींना प्रतिमाहं ₹५०००-०० शिष्यवृत्ती मिळते, या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेऊन, भारतीय पारंपरिक
कला,कौशल्ये जपावी असे आवाहन राजपूत यांनी केले,अधिक माहिती साठी योगेश मांजरे यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
