लोक न्यूज-
अमळनेर  येथील  दादासाहेब जी एम सोनारनगर येथील गजानन महाराज मंदिराची आज ता.27 रोजी सकाळी सात  वाजेला महिला पायी वारी शेगाव जायला सुरुवात झाली.
        येथील गजानन महाराज मंदिरात सकाळी 6.30 वाजता महाआरती झाल्यावर सकाळी सात वाजेला पायी वारीला सुरुवात झाली.यावेळी मंदिर परिसरात टाळ मृदूंगाच्या आवाजात महिला भक्त दंग होऊन ठेका धरला होता. विद्याविहार कॉलनीत  वारीच्या स्वागतासाठी  स्वच्छता केलेली होती.अंगणात सडा, रांगोळी टाकण्यात आलेली होती. मंदिरापासून पालखी निघताच ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. अमळनेर शहरासह ग्रामीण भागातून जवळपास दीडशे महिलांनी या पायीवारीत सहभाग घेतला आहे. पायी  वारीचे नियोजन मंदिराचे अध्यक्ष आर. बी. पवार सर, ज्योती पवार यांनी केले असून या पायी वारिसाठी डॉ. जिजाबराव पाटील, प्रवीण पवार, मोहीत पवार, श्रीकृष्ण चव्हाण, नितीन भावे,राजू पाटील,नींबा पाटील,डॉ. जगदीश साठे,वसंतराव जाधव, मधुकरराव शिंपी  यांचे सहकार्य लाभत आहे.
      आज ता.27 रोजी निघालेली पायी वारी ता.3 जानेवारीला शेगाव येथे पोहचणार आहे. यादरम्यान पायी वारीत सकाळी नास्ता, दुपारी जेवण, रात्रीचे जेवण व निवासाची सोय सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मंदिराचे अध्यक्ष आर. बी. पवार यांनी नियोजन केले आहे. दरम्यान सकाळी पायी वारीच्या स्वागतासाठी  अमळनेर शहरातील भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.