लोक न्यूज- नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील संविधान आर्मी जिल्हा युवा अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष मा.आकाशभाऊ जावरे यांनी व यांच्या टीमने सारंखेडा गावातील झालेला अनुचित प्रकार याचावर जाहीर निषेध व्यक्त करत नंदुरबार जिल्हाधिकारी व नंदुरबार पोलीस अधीक्षक यांना महिलांच्या व युवकांच्या मोठ्या संख्येने शांततेत मोर्चा घेऊन निवेदन दिले व त्यांनी संविधान आर्मी व भारतीय बौद्ध महासभा यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदना मार्फत विनंतीपूर्वक सांगितले आहे की निवेदनामध्ये एकूण आठ मुख्य मागण्या केलेल्या आहेत त्याच्यात पहिली मागणी म्हणजेच
1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पूर्णपणे सुशोभीकरण करणे
2. स्मारकाच्या आजूबाजूच्या जागेला तेथील बौध्द वस्तीच्या नावे करणे 
3.स्मारकाचे कामकाज राजकारणी लोकांच्या हातून काढून तेथील युवकांच्या हातात कामकाज देणे.
4.डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकास दत्त जयंतीच्या वेळेस लाईट शो दाखवण्यात यावा.
5.सारंगखेडा यात्रा ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी चा गट क्रमांक 476 हा कोणाच्या नावी आहे आणि ह्या जागेचे भाडे कोण घेत आहे ही चौकशी करण्यात यावी.
6.सारंखेडा यात्रेत येणाऱ्या महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊ न देणाऱ्या राजकारणी लोकांवर लवकरात लवकर शासन करण्यात यावे किंवा कडक कार्यवाही करण्यात यावी.
7. सारंखेडा येथील राजकारणी लोकांची गरीब लोकांवरची हुकूमशाही बंद करण्यात यावी.
8. सारंखेडा येथील बौद्ध युवकांना शिक्षणास अर्थडे निर्माण करणाऱ्या राजकारणी लोकांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
व सारंखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही घरगुती स्मारक समिती असून ती बरखास्त करून नवयुवक स्मारक समिती तयार करण्यात यावी.
अशाप्रकारे मुख्य आठ मागण्या संविधान आर्मी नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष मा.आकाशभाऊ जावरे व त्यांच्या सोबत त्यांची टीम तसेच संविधान आर्मी नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष. मा.किरणबाई शिरसाठ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस अधीक्षक साहेबांना पूर्ण महाराष्ट्राची जनतेकडून आव्हान केले आहे.