मारवड ता अमळनेर - लोक न्यूज
शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲपवर अधिकाधिक अभ्यास करावा यासाठी जिल्हा परिषद जळगाव दरमहा प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे सुचित केले आहे. यानुसार उपक्रमात मारवडच्या जि प शाळेने सहभाग घेऊन ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीनही महिन्यांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अभ्यास केला याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समिती च्या शिक्षण विभागात पारितोषिक वितरण झाले त्यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ श्री पंकज आसिया, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.विकास पाटील, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षीस मिळाले होते. याची दखल अमळनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी श्री.विश्वास पाटील , शिक्षणविस्तार अधिकारी श्री.पी.डी. धनगर, मारवड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख श्री शरद सोनवणे यांनी व्ही स्कुल अभ्यासात अमळनेर तालुक्यातुन प्रथम येणारी इयत्ता ३ री ची कु. माहेश्वरी रवींद्र साळुंखे, इयत्ता २री ची द्वितीय क्रमांक मिळवणारी प्रज्ञा दिग्विजय साळुंखे ,इयत्ता १ली तुन दिव्यांनी समाधान शिंदे, मानसी शशिकांत शिंदे यान बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी मारवाड शाळेचे मुख्याध्यापक श्री मनीषा निकम, विद्यार्थ्यांनचे पालक शाळेचे शिक्षक श्री.दिनेश रमेश मोरे ,श्रीमती शारदा संतोष जाधव उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामुळेच हे पारितोषिक मिळाले असे मारवाड गावात चर्चा आहे.

