लोक न्यूज-
अमळनेर- येथील धनदाई एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन प्राथमिक विद्यालयात हिवाळी क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली, शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धांचे उद्घाटन अमळनेर चे डीवायएसपी मा.राकेश जाधव साहेब यांनी केले. 
             कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात राकेश जाधव साहेब म्हणाले की, विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकासासोबत शारिरिक विकासाला वाव द्या,बुद्धीला चालना मिळते.बौध्दिक व शारिरिक विकास झाल्यास सर्वांगीण विकास होत असतो,असे त्यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.
          याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील, उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के. डी पाटील,अमळनेर काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, प्रकाश पाटील संचालक प्रा.नयना पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी क्रीडा शिक्षक प्रा.शैलेश पाटील, सुनिल जाधव, जेष्ठ शिक्षक यशवंत  सुर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता कापडणेकर उपस्थित होत्या.
           या सर्व विविध स्पर्धांचे आयोजन क्रीडा शिक्षक स्वप्निल पाटील यांनी केले.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.