वैजापूर-औरंगाबाद

 स्वच्छतादूत राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा वसा घेऊन वैजापूर शहरात साई माऊली सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५-३०वर्षपासून स्वच्छता करणारे,स्वच्छतादूत तथा मराठवाड्याचे बालसाहित्यिक    धोंडीरामसिंह राजपूत यांनी औरंगाबाद येथील राज्यस्तरीय लोकलावंत मेळाव्यात मंगळवार(ता,२९)रोजी टी, व्ही,सेंटर जवळील संभाजी महाराज पुतळा ते ए,पी,जे अब्दुल कलाम संशोधन केंद्रा पर्यंत प्रति गाडगेबाबा यांची वेषभूषा करून हातात खराटा घेऊन औरंगाबाद वासीयांना ही स्वच्छतेचे पाठ गिरवले, व" स्वच्छता नांदे ज्या घरी-आरोग्य तेथे वास करी"हा संदेश दिला, शिर्डी चे साई -
बाबा यांचीही भूमिका हुबेहूब वठविली त्यांच्या या कलेची दखल घेत या राज्यस्तरीय लोककलावंत मेळाव्यात त्यांना"स्वच्छता कर्मी पुरस्कार "जिल्हा शाखा लोककलावंत शाखेच्या वतीने अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,या प्रसंगी
राज्य लोककला शाखेचे अध्यक्ष विष्णू अण्णा शिंदे,शाहीर अशोक बागुल,समता परिषदचे आबासाहेब जेजुरकर,प्रमोद पठारे ( आबा जाधव शिवूर)यांची उपस्थिती होती,(फोटो कॅप्शन-स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत याना पुरस्कार देताना औरंगाबाद जिल्हा शाखेचे अध्यक्ष एकनाथ शेठ त्रिभुवन व ईतर).