नवीन समितीच्या सदस्यांचेस्वागत  करतांना कैलास साखरे काशिनाथ भावसार,व दाभाडे


वैजापूर-औरंगाबाद

येथील साई बहुउदेशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने दर वर्षी शिर्डीचे साईबाबा यांचा उत्सव श्री, साई सच्चरीत ग्रंथ पारायण,पायी दिंडी शिर्डी, व जि,प,प्रशाला मैदानावर भव्य कथा, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात,हे संस्थेचे१४वे वर्ष आहे, या वर्षी ही भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत,त्यासाठी नियोजन व्हावे म्हणून गुरुवार(ता,०१)रोजी सायंकाळी
साई भक्त राजेंद्र लालसरे यांच्या निवास स्थानी एक बैठक मर्चंट बँक चेअरमन विशालशेठ संचेती व कैलासशेठ साखरे यांच्या उपस्थितीत पार पडली यात
पुढीलप्रमाणे नवीन उत्सव समिती निवडण्यात आली,अध्यक्ष -विशाल शेठ संचेती,संस्थापक अध्यक्ष कैलास शेठ साखरे, कार्याध्यक्ष-उमेश राजपूत, उपाध्यक्ष-शैलेश पोंदे,प्रेम राजपूत,ठा,धोंडीरामसिंह राजपूत, सचिव-हरिष लालसरे,कोषाध्यक्ष-मेऊल पोकर्णे, सहसचिव -मनोज दोडे,ऋतिक राजपूत,मार्गदर्शन-राजेंद्र लालसरे,पूजाविधी -अण्णा अधिकार,प्रशांत गायकवाड,राजू साळुंके,नारायण राजपूत, या सर्व कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले, या प्रसंगी दिनेश राजपूत, काशिनाथ भावसार,गोविंद दाभाडे, माऊली गायकवाड,महेंद्र काटकर,राम उचित, सचिन राजपूत,पारस घाटे,गोकुळ पेहरकर, केशव आंबेकर,सुधीर लालसरे, महेश जाधव,गणेश अनर्थे,सोमु सोमवंशी मनोज गायकवाड, इत्यादी साई भक्त उपस्थित होते